या मुली संविधानावर आणि न्यायालयावर विश्वास ठेवून लढत आहेत. त्यांनी लढावे, त्या लढतील...
साक्षी आणि विनेशला लोकांचे प्रेम आणि साथ मिळाली, मात्र इतर खेळाडू, सेलिब्रटींचा म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नाही. मात्र हा लढा विविध अंगांनी महत्त्वाचा आहे. त्यांचे लढणे तमाम भारतीय महिलांसाठी दिशादर्शक आहे. ज्या मुली, महिला घाबरून किंवा इतर कारणांनी जबानी फिरवत आहेत, थकून लढणे सोडून देत आहेत, त्रासल्या आहेत, त्यांच्यासाठी या मुलींचे लढणे ‘उठा आणि लढा, आम्ही सोबत आहोत,’ असे सांगणारे आहे.......